भव्य आहे म्हणून ‘पुष्पा’ उत्तम चित्रपट आहे, असं म्हणता येणार नाही. नायकाला ‘अजिंक्यतारा’ बनवण्याच्या नादात चित्रपटाच्या कथेचा सत्यानाश होतो!
तस्करीच्या दुनियेतला बादशहा बनवण्यासाठी पुष्पाला एकाच वेळी चतुर, उद्धट, शूर, धाडसी, विनोदी, रोमँटिक, अशा अनेक रूपांत दाखवण्याच्या अट्टहासात बहुतेक वेळ अल्लू अर्जुनच पडद्यावर दिसतो. त्यातही बहुतेक वेळ तो थलैवा इष्टाईल मारामाऱ्या करतो. पुष्पा नावासारखं फूल नाही तर, आगीचा गोळा आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुष्पा दिसेल त्याला कापत सुटतो.......